सध्या महाराष्ट्रात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. अर्थात ही परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवलेली नाही. त्यामुळे याची प्रमुख कारणं काय? उपाय काय? याबाबत निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल शशिकांत दळवी यांनी लोकसत्ताशी संवाद साधला आहे. शशिकांत दळवी हे गेली १८ वर्षे जलसंधारणासाठी काम करत आहेत. २००३ मध्ये ‘रुफ टॅाप रेन वॅाटर हार्वेस्टिंग’ या आपल्या प्रकल्पांतर्गत त्यांनी आपली पुण्यातील विमान नगर सोसायटी टँकर मुक्त केली. त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील अनेक गावंही टँकर मुक्त होण्यात मदत झाली.