One Plus (1+) प्रीमियम रेंजमधील फोन प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जातात. काही प्रमाणात iphone ला ही मागे टाकेल असे फीचर्स असणाऱ्या या फोनची मागणीही खूप होती. मागील काही काळात वन प्लसच्या अनेक आवृत्त्या सुपरहिट झाल्या. पण त्यानंतर अनेक कंपन्यांनी हे फीचर्स कमी किमतीत देऊन वन प्लसला टक्कर दिली. रेडमी, रिअल मी, शाओमीच्या उत्पादनांची मार्केटमध्ये मागणी वाढू लागताच आता वन प्लसने सुद्धा परवडणाऱ्या रेंजमधले फोन बाजारात लाँच केले आहेत. त्यातलाच एक नव्याने लाँच झालेला फोन म्हणजे वन प्लस नॉर्ड सीई 4. वन प्लसच्या आतापर्यंतच्या सर्व फोनमधील, सर्वात बेस्ट कॅमेरा व बॅटरीचा हा फोन आपण का खरेदी करायला हवा किंवा का खरेदी करू नये याविषयी सविस्तर जाणून घेऊया..