भावा Chill मारू म्हणत केलेल्या प्लॅन्समध्ये अनेकदा बिअरची प्रचंड मागणी असते. म्हणूनच जगभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या पेयांमध्ये बिअरचं नाव येतंच. अर्थात मज्जा करण्यासाठी मद्यपान करायलाच हवं असं काही नाही. पण आठवडाभर ऑफिस मध्ये राबल्यावर एखाद्या वीकेंडला मित्रांसोबत बियर पित स्ट्रेस कमी होतो असं अनेकजण सांगतात. आणि याच मंडळींसाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला शुक्रवार अगदी खास असतो कारण याच दिवशी आंतरराष्ट्रीय बिअर डे साजरा केला जातो. २००७ साली पहिल्यांदा हा दिवस सेलिब्रेट केला गेला. बिअर निर्मात्या कंपनी, कर्मचारी, बारटेंडर आणि इतर बिअर तंत्रज्ञांच्या कामाचे कौतुक करावे हा या दिवसामागील उद्देश होता. यानिमित्ताने आज आपण बिअर डे विषयी इंरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत.
International Beer Day is a celebration on the first Friday of every August founded in 2007. Beer Day has grown from a small localized event in the western United States into a worldwide celebration spanning 207 cities, 80 countries and 6 continents. Let us Look at all the interesting Facts About Beer Day.
(Note: Loksatta Does Not Support Or Promote Any Kind Of Alcohol Or Addictive Substances)