श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे! श्रावण म्हणजे खरंतर हिरवळीचा महिना, पण याच महिन्यात रेड सिग्नलप्रमाणे अनेक नियम विशेषतः आहार विषयक नियम आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यापासून थांबवतात. पण श्रावणात खरोखरच मांस, मच्छी टाळायला हवी का? श्रावणात नॉनव्हेज न खाल्ल्याने शरीरात काय बदल होऊ शकतात? याविषयी आज आपण आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तसेच श्रावणात बाजारात येणाऱ्या वेगवेगळ्या रानभाज्या, पालेभाज्या खाताना जास्त पोषण मिळवण्यासाठी काय करावं हे सुद्धा आपण ऐकणार आहोत. श्रावणात कोहळ्याचा ज्यूस प्यायल्याने खरोखरच वजन कमी करण्यास मदत होऊ शकते का याविषयी सुद्धा आपल्याला पल्लवी सावंत पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले आहे. श्रावणातील आहार नियमांविषयी आपण आजच्या भागात जाणून घेऊया..
Shravan is actually the month of greenery, but in this month many rules especially dietary rules stop us from eating different foods. But should we really avoid meat and fish in Shravan? What changes can occur in the body by not eating non-veg during Shravan? Today we are going to learn about this from nutritionist Pallavi Sawant Patwardhan. Also we are going to hear what to do to get more nutrition while eating different Monsoon vegetables and leafy vegetables that come in the market during Shravan. Pallavi Sawant Patwardhan also guides us on whether drinking Ash gourd juice during Shravan can really help in weight loss. Let us know about the diet rules in Shravan in today’s episode..