संत्र्यापेक्षा सातपट जास्त व्हिटॅमिन सी, पालकापेक्षा तिप्पट लोह, दुधापेक्षा चारपट जास्त कॅल्शियम असलेल्या कोकणकरांच्या प्रिय भाजीचे फायदे आज आपण पाहणार आहोत. श्री कृष्णजन्माष्टमी म्हटली की कोकणातल्या घरांमध्ये शेवग्याच्या पानांची किंवा शेगळ्याची भाजी असतेच. तुम्हाला माहीत आहे का? शेवग्यामध्ये सुमारे ६.७ ग्रॅम प्रोटीन असते जे स्नायूंच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, नवी दिल्ली येथील पोषणतज्ज्ञ कनिका नारंग यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा साठा असतो. शेवग्याचे हेच फायदे आपण पाहूया.