Dead Butt Syndrome: तुम्ही जर एकाच ठिकाणी खूप वेळ बसून असाल आणि उठल्यावर तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ लागल्या, तर कदाचित ही ‘डेड बट सिंड्रोम’ची लक्षणे असू शकतात.धावपळीच्या आयुष्यात पण एका जागेवर बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश लोकांचे काम तासन् तास कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून असते. नऊ तास एकाच ठिकाणी बसून राहिल्याने अनेक मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवतात. बैठ्या जीवनशैलीकडे लोकांचा कल जसजसा वाढत चालला आहे, तसतशा आरोग्याच्या नवनवीन समस्याही उद्भवताना दिसत आहेत. त्यातलीच एक म्हणजे ‘डेड बट सिंड्रोम’. ही स्थिती नेमकी काय, हा त्रास वाचवण्यासाठी आपण काय करायला हवं हे आजच्या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत.