Height to Weight Ratio, Fat Loss Funda: श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट दिल्ली येथील वरिष्ठ सल्लागार, डॉ. अरविंद अग्रवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीमध्ये, वय आणि उंचीनुसार योग्य वजन किती हवं याविषयी सांगितलं आहे. आजच्या व्हिडीओमध्ये आपण हे वजनाचं सूत्र, त्याची योग्यता आणि गरज याविषयी जाणून घेणार आहोत. उंचीनुसार वजन किती असावं हे शोधण्याचं सूत्र म्हणजे बीएमआय. बॉडी मास इंडेक्स. अलीकडे अनेक डिजिटल घड्याळं, ऍप्समध्ये सुद्धा बीएमआय मोजण्याची सोय असते. उंची व वयानुसार तुमचं आदर्श वजन किती हवं हे हा बीएमआय सांगतो, त्यामुळे आदर्श BMI किती हवा, तसेच शरीरातील फॅट्सची योग्य टक्केवारी किती असायला हवी याविषयी डॉक्टरांनी दिलेली माहिती पाहूया.