World AIDS Day 2024 कधीही बरा न होणारा, अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरलेला आजार म्हटला की समोर येणाऱ्या नावांच्या यादीत HIV एड्सचं नाव सुद्धा असतंच.कोणत्याही अन्य आजाराप्रमाणेच प्रतिकारशक्ती कमी करून शरीर क्षीण करणारी अशी ही स्थिती असली तरी त्याला जोडून येणाऱ्या सामाजिक दृष्टिकोनामुळे याबाबत अनेकदा मौन बाळगले जाते, परिणामी या आजाराविषयी गैरसमजुती वाढण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. ही स्थिती लक्षात घेता दरवर्षी जगभरात १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस पाळला जातो. यानिमित्ताने ए़ड्सच्या प्रसाराची प्रमुख कारणं, मानवी शिररातील आजाराचा शिरकाव याविषयी जाणून घेऊ.