‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या पाचव्या भागात आपण अस्सल पुणेकर ‘अथर्व सुदामे’ ला भेटण्यासाठी पुण्यात पोहोचलो आहोत. राज ठाकरे यांचा अत्यंत आवडता क्रिएटर ते रितेश देशमुख, सुनंदन लेले यांचा रील पार्टनर सगळ्या गमतीजमती अथर्वकडून जाणून घेणार आहोत. दर्शना पवार, कोयता गॅंग आणि अन्य अनेक प्रकारचे गुन्हे विद्येच्या माहेरघरात वाढण्याचे कारण काय व पुणेकरांच्या बाबतीतले समज खरे आहेत की खोटे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडीओत पाहा.