‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या आठव्या भागात आपण भेटणार आहोत ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरला. कोकणातील एक मुलगी मुंबईत येते आणि सोशल मीडियावर आपल्या मालवणी कंटेंटने धुमाकुळ घालते. हे सगळं कसं जमून आलं? म्हणून तिचा हा रंजक प्रवास जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. विशेष म्हणजे या भागात अंकितासह तिचं कुटुंबही सहभागी झालं आहे. त्यामुळे त्यांनी नेमके काय काय किस्से सांगितलेत ते नक्की पाहा…