‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या अकराव्या भागात आपण भेटणार आहोत ‘कलर्स ऑफ कोकण’ या चॅनेलच्या कुटुंबाला. मुंबईत राहून कोकणी आयुष्याची झलक दाखवणारा विनय घाडीगावकर, साधीभोळी पण तेवढीच खट्याळ पुष्पा-पुनग्याची जोडी व कलाकार बाबल्या यांची कहाणी दाखवताना हे चॅनेल कोकणी सण-उत्सवाची जगाला ओळख करून देत आहेत. कोकणची माणसं साधी भोळी असं का म्हणतात हे दाखवणारे नाना आणि त्यांच्या गजाली, देवगडच्या या सुंदर गावाची झलक हे सगळं काही या भागात पाहूया.