लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ या सीरीजच्या चौदाव्या भागात आपण लावणीसम्राट किरण कोरेशी गप्पा मारणार आहोत. आई वडिलांच्या निधनानंतर लावणीकडे वळलेला किरण कोरे लावणीसम्राट कसा झाला, किरणचं शिक्षण किती, मुलींचा मेकअप करताना दाढी कशी त्रास देते, लावणी करताना स्टेजवर कधी फजिती झाली आहे का, वाढीव दिसताय राव गाण्यासाठी पुरुष लावणी नर्तक कसा निवडला गेला याविषयी किरणने अनुभव शेअर केले आहेत. किरणचा नथ व मेकअपचा व्यवसाय काय आहे? ट्रोलर्सला तो कसा सामोरा जातो व डीजे शो करणाऱ्या नर्तक- नर्तिकांना तो काय सल्ला देईल याविषयीच्या गप्पा या एपिसोडमध्ये जाणून घेऊया..