नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १७ व्या भागात आपण अतरंगी ‘सोटी पोरगी’ची भेट घेणार आहोत. नागपूरची निधी देशपांडे ही मागील सात वर्षांपासून नेटकऱ्यांना खळखळून हसवण्याचे काम करतेय. विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेली प्रोफेसर निधी जेव्हा व्हायरल बिंदियाज ऑनलाईन शॉपची मालकीण बनून आपल्या भन्नाट अंदाजात व्हिडीओ बनवते तेव्हा नेटकरी पोट धरून हसतात. लोकसत्ताच्या या खास कार्यक्रमात निधीने आपल्या या लाडक्या पात्रांविषयी आठवणी सांगितल्या आहेत, तसेच एक कलाकार म्हणून काम करताना बॉडी शेमिंग, ट्रोलिंगला कसं सामोरं जायचं याविषयीही तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. या भागात आपण निधीच्या व्हिडिओमधील पडद्यामागचे मोटिव्हेशन म्हणजेच श्री व सौ. देशपांडे तसेच निधीचे यजमान यांच्याकडूनही निधीच्या न माहित असलेल्या किस्स्यांविषयी ऐकणार आहोत. व्हिडीओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका.