नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १८ व्या भागात आपण कोकणकरांचा लाडका अनिकेत रासम याच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत. नोकरी सोडून ‘गोष्ट कोकणातली’ची निर्मिती करताना नेमका काय विचार मनात होता? गावाला स्थायिक होण्यासाठी बायकोने कशी साथ दिली? शूटिंग करताना आईची कशी तयारी होते? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनिकेतने आपल्या खास सत्रात दिली आहेत. युट्युबचा प्रवास सुरु करताना शंका मनात असून लेकाच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या अनिकेतच्या बाबांचं बोलणं तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. नात्याची घडी कशी जपावी याचं गाईडबुक ठरलेला हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.