नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरजच्या १९ व्या भागात आपण ‘Wow Samruddhi’ चॅनेलच्या समृद्धी पाटील राऊळ हिच्यासह गप्पा मारणार आहोत. इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करत असताना कला जोपासण्याच्या प्रयत्नातून तिने युट्युबचा प्रवास सुरु केला. कोकणातली संस्कृती समजावून सांगताना तिच्या आवाजाची जादू अनेकांना भुरळ पाडून गेली. अगदी घरगुती व्हिडीओ बनवताना कधी शेतीतून, कधी लग्न, सणसमारंभातून माणसं जोडण्याची सुरुवात केली. तिच्या ‘कृष्णवाणी’ व्हिडीओजमधून तिने अनेकांना साकारातमक कसे राहावे हे शिकवले आहे. आज इन्फ्लुएन्सर्सच्या जगात मुलाखती निमित्त तिच्या कुटुंबासह गप्पा या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच बाळासह घर सांभाळताना, व त्यात करिअर घडवणाऱ्या अनेक महिलांची प्रतिनिधी म्हणून आपण तिचा प्रवास जाणून घेऊया..