गृहिणी आहे पण स्वतंत्र जगते असं प्रत्येक महिलेला म्हणता यावं यासाठी त्यांना उमेद देणारी रचना टाकळे हिच्याशी आपण लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजमध्ये खास गप्पा मारणार आहोत. रचनाने एका महिन्यात चॅनेल मोनेटाईज करण्याचा प्रवास, पहिलं युट्युब पेमेंट आणि त्यानंतरचा पाच वर्षांचा अनुभव यातील अनेक अनुभव व किस्से शेअर केले आहेत. पहिल्यांदाच रचना नव एंजेल वर्ल्डचा महत्त्वाचा भाग असलेले रचनाचे पती म्हणजेच डॉ. सनी टाकळे आणि तिच्या सासूबाई सुद्धा कॅमेरासमोर मजेशीर प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. आईकडून घेतलेले धडे, सासूकडून मिळालेलं बळ, पतीची साथ आणि लाडक्या लेकीमुळे मिळालेला आनंद हे सगळं कसं जपलं याविषयी रचनाने मारलेल्या गप्पा आणि काही खास टिप्स या एपिसोडमध्ये आवश्य पाहा.