लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजच्या २१ व्या भागात आज आपण भेटणार आहोत, क्रेझी फूडी रंजिता या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या रंजिता पाटील यांना. हलाखीचे दिवस बदलता येतात फक्त श्रद्धा सबुरी बाळगायला हवी असं म्हणणारी रंजिता आज ६ लाखाहून अधिक स्बस्क्राइबर्सच्या मनावर राज्य करत आहे. या प्रवासात तिने सामना केलेल्या ट्रोल्ससाच्या व कमावलेल्या कौतुकाच्या काही खास गप्पा गोष्टी ती आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे. बुर्ज खलिफा येथे नऊवारी नेसून जाण्यापासून ते रेल्वे ट्रॅकवर शूट केलेल्या त्या कठीण प्रसंगापर्यंत अनेक किस्से सुद्धा रंजिताने आपल्याला सांगितले आहेत. या पहिल्या भागात आपण रंजिताची भेट घेणार आहोत तर पुढच्या भागात रंजिताच्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत.