लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजच्या २२ व्या भागात आज आपण भेटणार आहोत, क्रेझी फूडी रंजिता या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या रंजिता पाटील यांना. रंजिता आज ६ लाखाहून अधिक स्बस्क्राइबर्सच्या मनावर राज्य करत आहे. रंजिता व रोहन यांनी पहिल्यांदाच आपली लव्ह स्टोरी लोकसत्ताच्या या खास सिरीजच्या निमित्ताने शेअर केली आहे. वालाच्या भाजीवरून जुळलेलं प्रेम ते ओवीच्या रूपात मिळालेली ग्रेट भेट याबाबत या जोडप्याने काही खास क्षण शेअर केले आहेत. जुन्या नव्या माणसांना जोडताना रंजिता सगळी नाती कशी सांभाळते याविषयी या भागात आपण ऐकणार आहोत.