इन्फ्लुएन्सर्सच्या जगातच्या २५ व्या भागात आपण सरिता किचनच्या सर्व्हेसर्व सरिता पद्मन भेटणार आहोत. सुरवातीला स्वतःचा खानावळीचा व्यवसाय सांभाळण्यापासून ते अनेकांना नोकरीच्या संधीबद्दल मार्गदर्शन करण्यापर्यंतचा प्रवास आणि अनेक प्रतिष्ठित रेसिपी चॅनल असताना सुद्धा स्वतःचे स्थान कसे निर्माण केले हे पाहणार आहोत. नवरा भारतीय नेव्ही ऑफिसर असताना, एक बायको म्हणून त्यांनी संसारात पाहिलेले चढ-उतार; आंध्र, अंदमान अशा भारतातील विविध ठिकाणी राहताना अशा सतत होणाऱ्या भौगोलिक बदलाचा त्यांनी कसा उपयोग करून घेतला; तसेच, नवऱ्याने पंधरा वर्षांनी नेव्हीतील नोकरी सोडल्यानंतर या जोडीने एकमेकांना कशी साथ दिली याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊ.