इन्फ्लुएन्सर्सच्या जगातच्या 26 व्या भागात आपण mood and food Marathi या युट्युब चॅनेलच्या सर्वेसर्वा रेश्मा यांनी भेटणार आहोत. कोल्हापुरी भाषेत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या रेश्मा ताईंनी पाच लाखांची युट्युब फॅमिली जोडली आहे. पोळीचा व्हायरल व्हिडीओ आणि मग सिल्व्हर प्ले बटण असा प्रवास करताना त्या स्वतःच्या पायावर उभ्या कशा राहिल्या हे आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. युट्युबचे व्हिडीओ, घरकाम, जेवणाची मेस हे सगळं करताना कारभाऱ्यांची होणारी मदत आणि पिल्लुची धम्माल सुद्धा त्यांनी शेअर केली आहे.