नमस्कार मंडळी, लोकसत्ता ऑनलाईन प्रस्तुत ‘इन्फ्लुएन्सरच्या जगात’ या सीरीजचा २८ वा भाग आम्ही घेऊन आलो आहोत. आजच्या भागात आपण भेटणार आहोत मास्टरशेफच्या टॉप ३६ मध्ये झळकलेला सांगलीचा हिरा, म्हणजेच आपला युट्युबवाला सॅम. प्रसिद्ध कुकिंग शो मास्टरशेफ मध्ये पोहोचलेला पहिला मराठी मुलगा अशी त्याची ओळख आहे. मुलगा जेवण बनवतो हे पाहून नातेवाईकांनी मुरडलेली नाकं ते टीव्हीवर मुलाला पाहून वाटलेला अभिमान हा प्रवास सांगण्यासाठी आज संभाजीची आई सुद्धा आपल्याबरोबर असणार आहे. झुणका भाकरी केंद्र उघडण्याचं स्वप्न ते मातीच्या भांड्यांची काळजी घ्यायचं तंत्र अशा विविध विषयांवर गप्पा आज आपण ऐकणार आहात. तसेच संभाजीने आज आपल्यासाठी खास विना चिकाचा खरवस सुद्धा बनवला आहे, त्याची रेसिपी सुद्धा पाहूया..