लोकसत्ता ऑनलाईन प्रस्तुत ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ च्या २९ व्या भागात आज आपण भेटणार आहोत, एकांकिका स्पर्धेतून समोर आलेली रीलस्टार सायली इंदुलकरला. पहिल्यांदा सायलीने कुटुंबासह धम्माल गप्पा मारत मुलाखत दिली आहे. नालासोपाऱ्यातले किस्से ते एकांकिकांमधील अनुभव सांगताना सायलीने २३ वर्षांतील आपल्या धम्माल आठवणी सांगितल्या आहेत. अटल करंडक स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर सायलीचं आयुष्य कसं बदललं, मुंबई लोकलमध्ये शूट करताना विरारकर कशी मदत करतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देताना तिने सांगितलेले किस्से आज आपण ऐकणार आहोत. इंदुलकर कुटुंब व त्यांचे हसरे क्षण या भागात पाहायला विसरू नका.