लोकसत्ता ऑनलाईन प्रस्तुत इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरीजमध्ये आपण भेटणार आहोत मुंबई लोकलमध्ये प्रवासात भजन गाणाऱ्या ग्रुपला. तरुणांपासून ते सिनियर्सपर्यंत, स्त्री व पुरुष दोघांनाही भुरळ पाडणारा लोकल ट्रेनच्या डब्यातील हा ग्रुप वेगवेगळ्या भजन मंडळांच्या माध्यमातून तब्बल ३६ वर्षांपासून प्रवास करत आहे. आजच्या लोकसत्ताच्या मुलाखतीत या ३६ वर्षात भजनामुळे आलेल्या अनुभवांविषयी त्यांनी गप्पा मारल्या आहेत. तसेच मागील काही काळात गण, गवळण, अभंगाचे स्वरूप कसे बदलले आहे, वारकरी सांप्रदायाचे काही नियम काय आहेत याविषयी सुद्धा आपल्याला अविनाश आंब्रे यांनी माहिती दिली आहे. लोकलच्या डब्यात भजनाचे व्हिडीओ शूट करणं, टाळ, ढोलकी घेऊन ट्रेन पकडणं हे करताना होणारी धम्माल आपल्याला सुहास बंडागळे व ग्रुपने सांगितली आहे. देव माझा मल्हारी गाण्याने घरोघरी पोहोचलेले सदा लाडके व मुळीच नव्हतं रे कान्हा म्हणत १५ मिलियन व्ह्यूज आणणाऱ्या ऋतुराज दिवेकरचा व्हायरल होण्याचा अनुभव ऐकुया.