‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर आणि सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी ‘मधुमेहाचे आव्हान आणि करोना काळ’ या विषयावर डॉ. शशांक जोशी यांच्याशी वेबसंवाद साधला. यावेळी डॉ. जोशी यांनी मधुमेहींच्या निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचे कानमंत्र वाचकांना दिले. जगाच्या कानाकोपऱ्यातील ‘लोकसत्ता’चे वाचक या वेबसंवादात सहभागी झाले होते.