दक्षिण दिल्लीतील मुलांचा ‘इन्स्टाग्राम’वरील नुकताच उघडकीस आलेला ‘बॉइज लॉकर रूम’ हा ग्रुप, त्यावरील मुलींविषयीच्या विकृत चर्चेमुळे अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला.
मुला-मुलींच्या लैंगिक जाणिवांपासून पालकत्वाच्या आव्हानापर्यंत आणि मुलांवरील गुन्हेगारीच्या सावटापासून इंटरनेटच्या व्यसनाधीनतेपर्यंत अनेक प्रश्नांची वेध घेणारी चर्चा ‘लोकसत्ता’ आयोजित ‘चतुरंग चर्चा’ या उपक्रमात करण्यात आली.