पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याचे विस्तृत विच्छेदन अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी मंगळवारी केले. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रस्तुत ‘लोकसत्ता विश्लेषण’ या वेबसंवादात हा संवाद साधला.