ज्येष्ठ संगीतकार इलाय राजा, ऑस्करप्राप्त ए. आर. रेहमान यांच्यासह काम करण्याचा अनुभव, हिंदी-मराठी चित्रपटांतील अनेक लोकप्रिय गाण्यांमागील गोष्टी सांगत आहेत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका बेला शेंडे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात बेला आणि प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्यातील गप्पांची मैफल रंगणार आहे.