करोनामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांपुढे नवे प्रश्न, नवी आव्हाने उभी राहिली आहेत. सर्वत्रच अनिश्चिततेचे वातावरण असताना अभ्यासात मन कसे रमवायचे, या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन यश कसे संपादन करायचे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहेत. याबाबत ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ या विशेष वेबसंवादात सनदी अधिकारी मनीषा म्हैसकर (प्रधान सचिव, राजशिष्टाचार) यांनी मार्गदर्शन केले.