टाळेबंदीचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले तरी शिक्षण धोरणाबाबत अनिश्चितता कायम आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) परीक्षा जाहीर केल्या आहेत, पण अजूनही अभ्यासिकांचा मार्ग खुला झालेला नाही. सद्य:स्थितीत अभ्यास कसा करावा, इंटरनेटवरील माहितीचा अभ्यासात नेमका वापर कसा करायचा, या आणि अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ वेबसंवादात हरयाणाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव अजित जोशी यांनी दिली. सनदी अधिकारीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांच्या अभ्यासाचे आणि यशाचे गमक त्यांनी यावेळी उलगडले