मायानगरी मुंबापुरीत पाय ठेवल्यानंतर ठरवून नाटक, टीव्ही मालिका तसेच चित्रपटांमध्ये कारकीर्द फुलवत मराठी जनांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा यशस्वी प्रवास ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’च्या नव्या पर्वात जाणून घेता आला. अभिनेते आणि तरुणाईचे लाडके दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने ही गप्पांची मैफल रंगवली.