गलवान खोऱ्यात गेल्या आठवडय़ात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये उडालेल्या भीषण धुमश्चक्रीमुळे दोन्ही बाजूंकडे मोठी मनुष्यहानी झाली. चीनविषयी संशय बळावणाऱ्या या घटनेचा आणि तिच्यामागील चीनच्या डावपेचांचा वेध विख्यात सामरिक विश्लेषक आणि भाष्यकार जयदेव रानडे यांनी ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये घेतला. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.