लोकसत्ता सहज बोलता बोलता या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या नाटकातल्या कारकिर्दीवर मनमोकळा संवाद साधला. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी त्यांची मुलाखत घेतली. ज्यामध्ये प्रशांत दामले यांनी त्यांचं बालपण, नाटकाविषयी असलेली ओढ, नाटकात एंट्री कशी झाली या सगळ्या आठवणींचा पट उलगडला.