आधुनिक पिढीतील क्रिकेटपटू फक्त पैसा कमावण्यासाठी आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी क्रिकेट खेळतात. देशासाठी सर्वस्व झोकून देणारे क्रिकेटपटू आता क्वचितच आढळतात. ट्वेन्टी-२० लीगच्या वाढत्या प्रमाणामुळे पैसे कमावणे सोपे झाल्याने सध्याच्या क्रिकेटची परिभाषा बदलली आहे, असे परखड मत विख्यात क्रिकेट विश्लेषक मकरंद वायंगणकर यांनी मांडले.