महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेत डॉ. सलील कुलकर्णी यांनी भावसंगीताच्या समृद्ध परंपरेचा पटच उलगडून दाखवला. यावेळी त्यांनी काही गीते सादर करीत सुरेल शब्दमैफल रंगविली. आता रसिकांनीही भावसंगीतापर्यंत पोहोचायला हवं, थोडा शोध घ्यायला हवा, अशी अपेक्षा सलील कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.