‘लोकसत्ता’च्या ‘मधली सुट्टी’ या उपक्रमात चित्रकार निलेश जाधव यांनी वेबसत्राद्वारे मुलांना व त्यांच्या पालकांना चित्र कसे काढावे, याचा मूलमंत्र दिला. पाठ्यपुस्तकातील चित्रे पाहून मुलांना विषयाची गोडी निर्माण होत असते. त्यामुळे मुलांच्या जीवनात चित्रांचे महत्व खूप आहे असं त्यांनी सांगितलं. चित्र काढताना चित्त एकाग्र असणे महत्त्वाचे असल्याने मुलांची एकाग्रताही वाढते अशा शब्दांत असं त्यांनी मार्गदर्शन केले.