कला शाखेत शिक्षण घेऊन प्रसिद्ध झालेल्या शशी थरूर, हरीश साळवे अशा अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे कला शाखा म्हणजे दुय्यम हा समज विद्यार्थी आणि पालकांनी दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. कला शाखेत शिक्षण घेतल्यानंतर शैक्षणिक-संशोधनासह व्यावसायिक क्षेत्रातही अनेक वाटा खुल्या होतात, असं मत ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक डॉ. श्रीराम गीत यांनी मांडलं आहे. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘मार्ग यशाचा’ या वेब-संवादात डॉ. गीत यांनी कला शाखेतील विविध अभ्यासक्रम, पदवी-पदव्युत्तर पदवीनंतरच्या संधी, परदेशातील शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा अशा सर्व अंगाने सविस्तर माहिती दिली.