विज्ञान शाखा आणि आनुषंगिक क्षेत्रात करिअर करायचे असल्यास दहावीनंतर जागरूकपणे विषयांची निवड करणे आणि प्रवेश परीक्षांची तयारी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात असं ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी सांगितलं आहे. करोनाकाळातही करिअर निवडीचा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सहज सुटावा यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ हा करिअर वेबसंवाद नुकताच पार पडला. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या वेबसंवादाचे सहप्रायोजक होते.