शहरात नागरी सुविधा पुरवताना प्रशासकीय कामकाजाची पद्धत काय? नेमके कोणते टप्पे असतात? याबद्दल अनेकदा सामान्य नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे याबाबत प्रशासन आणि नागरिकांमध्ये प्रभावी सुसंवाद घडवण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘शहरभान’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे पहिले सत्र ११ ऑगस्ट रोजी ठाण्यात पार पडले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांशी संवाद साधला. शहरविकासाबाबत त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली पाहा…