भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या वाटलाचीची प्रोसेस ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात उलगडली. शांत, संयमी आणि त्याचवेळी तत्वांशी ठाम असणाऱ्या अजिंक्यचं सर्वसमावेशक व्यक्तिमत्व यानिमित्ताने अधोरेखित झालं. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर आणि क्रिकेटप्रेमी रंगकर्मी विनय येडेकर यांनी अजिंक्यला बोलतं केलं.