नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याच्या हेतून ‘लोकसत्ता’ने ‘शहरभान’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. ३१ ऑगस्ट रोजी अंबरनाथ येथील रोटरी कल्बच्या सभागृहात ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रम पार पडला. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चौथ्या मुंबईचे प्रवेशद्वारे असलेल्या अंबरनाथ शहराच्या विकासाच्या नव्या पॅटर्नविषयी देखील सांगितले.