गेल्या महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची भूमिका अनेकांना घेतली. त्यामुळे ओबीसी समाजानेही आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान, महाराष्ट्रातील आरक्षणाच्या या पेचावर ओबीसी समाजाचे नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात सडेतोड भूमिका मांडली आहे.