‘लोकसत्ता शहरभान’च्या कार्यक्रमाला यावेळी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या संचालक आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपस्थिती लावली होती. मुंबईतील मेट्रो प्रकल्प अनेक कारणांनी अनेकदा चर्चेत राहिला आहे. शहरातील लोकसंख्या वाढत आहे. अशावेळी शहर व्यवस्थापनाच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प एक महत्त्वाचा भाग आहे. या संदर्भात अश्विनी भिडे यांनी शहरभानच्या मंचावरून मेट्रो ३ प्रकल्पाविषयी सविस्तर भूमिका मांडली.