‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ या उपक्रमांतर्गत २७ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शहरातील अनेक समस्या नागरिकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावी निर्माण झाल्या असल्याचं मत व्यक्त केलं. शिवाय प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी पोलीस यंत्रणा कायम झटत असते, मात्र नागरिकांनीही त्यांच्या जबाबदारीचं भान राखावं, असं आवाहनही त्यांनी केलं.