राज्यातील बंदरांचा विकास आणि भविष्यातील योजनांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ४ जानेवारी रोजी ‘पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचं उद्घाटन राज्याचे बंदर विकासमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत समारोप झाला. बंदरांची सध्याची स्थिती काय आहे? व्यापार आणि निर्यातीमधील महाराष्ट्राचं एकूण चित्र काय असेल आणि भविष्यातील बंदरांचा विकास यावर कॅान्क्लेव्हमध्ये चर्चा झाली.