गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला. अशातच आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत”, असं सचिन वाझे म्हणाले.