Pankaj Kapoor Exclusive Interview: जासूस करमचंद, ‘जबान संभाल के’ मालिकेतील विविध भाषिकांना हिंदी शिकवण्याची धडपड करणारा प्राध्यापक मोहन भारती, ‘ऑफिस ऑफिस’ (Office Office) मालिकेतील मध्यवर्गीय मुसद्दीलाल ते विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मकबूल’ (Maqbool) चित्रपटातील जहाँगीर खान ऊर्फ अब्बाजी अशा कैक व्यक्तिरेखा गाजवणारे प्रतिभावंत अभिनेते पंकज कपूर यांच्याशी ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने संवादयोग जुळून आला आहे. गेली पाच दशके चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अमीट छाप उमटवणारे पंकज कपूर यांच्याशी गप्पांची मैफल..