अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पटकावले आहे. विजयानंतर भारतीय संघ आज मायदेशात दाखल झाला आहे. आज सायंकाळी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथून भारतीय संघाची विजयी परेड निघणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकर सकाळपासूनच मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झाले आहेत. या चाहत्यांशी लोकसत्ताने साधलेला हा संवाद…