भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया हे लोकसभेत बोलले आहेत. ते म्हणाले, “पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमधून कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. यावरुन भारतीय ऑलिम्पिक संघटनेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) कडे तीव्र निषेध नोंदवाल आहे. IOA अध्यक्ष पीटी उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत, पंतप्रधानांशी त्या बोलल्या आहेत. त्यांना आवश्यक ती कारवाई करण्यास सांगितले आहे. सरकारने विनेश फोगट यांना सर्व सुविधा दिल्या आहेत.”