सीतेचे अपहरण केल्यानंतर रावणाने तिला लंकेतील अशोक वनामध्ये ठेवल्याचा उल्लेख येतो. मुंबईत अनेकदा रस्त्याच्या कडेला सरळसोट वाढलेल्या वृक्षाला आपण अनेकदा अशोक म्हणतो पण हा खरा अशोकवृक्ष नाही, तो आहे आसूपालव. पण मग मूळ सीताअशोक पाहायचा तर त्यासाठी इथं यायला हवं. तीच कथा आहे कृष्णवडाचीही. महाभारताशी थेट नातं असलेला हा दुर्मीळ वृक्ष पाहायचा तर त्यासाठीही आपल्याला ‘या’च ठिकाणी यावं लागतं!