काही झाडाझुडुपांना विशिष्ट प्रकारचे वातावरण आवश्यक असते. अन्यथा ती जगत नाहीत आणि जगली तरी बहरत नाहीत. ती दिसायला तशी अगदीच लहान असली तरी जीवसृष्टीच्या दृष्टीने त्यांचे असणे आणि कार्य दोन्ही महत्त्वाचे असते. त्यांच्याच संरक्षण- संवर्धानाची ‘ती’ची निर्मिती करण्यात आली, तब्बल १६० वर्षांपूर्वी! आणि या मुंबईत असलेल्या ‘ती’च्या जुळ्या बहिणीला भेटायचे तर थेट लंडनच गाठावे लागेल!